Ipc कलम ४९६ : कायदेशीर विवाह न करता कपटीपणाने आपला विवाह संस्कार करुन घेणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४९६ :
कायदेशीर विवाह न करता कपटीपणाने आपला विवाह संस्कार करुन घेणे :
(See section 83 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : विवाहविधीमुळे आपण कायदेशीरपणे विवाहबद्ध होत नाही याची जाणीव असताना कपटपूर्ण उद्देशाने तो विधी करवून घेणे.
शिक्षा :७ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
अप्रामाणिकपणाने किंवा कपटपूर्ण उद्देशाने जर कोणी स्वत:च्या बाबतीत विवाहबद्ध होण्याचा संस्कार करुन घेतला आणि त्याद्वारे आपण कायदेशीरपणे विवाहबद्ध होत नाही याची त्याला जाणीव असेल, तर त्याला सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply