Ipc कलम ४८९-ब: बनावट किंवा नकली चलनी नोटा किंवा बँक नोटा खऱ्या म्हणून वापरणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४८९-ब:
बनावट किंवा नकली चलनी नोटा किंवा बँक नोटा खऱ्या म्हणून वापरणे :
(See section 179 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बनावट किंवा नकली चलनी नोटा किंवा बँक नोटा खऱ्या म्हणून वापरणे.
शिक्षा :आजीवन कारावास किंवा १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
————
जो कोणी कोणतीही बनावट, किंवा नकली चलनी नोट, किंव बँक नोट ती बनावट किंवा नकली असल्याचे माहीत असून, किंवा तसे समजण्यास कारण असून, ती खरी म्हणून अन्य कोणत्याही व्यक्तीला विकेल किंवा तिच्याकडून खरेदी, किंवा घेईल, किंवा अन्यथा तिचा अपव्यापार किंवा उपयोग करील त्याला, १.(आजन्म कारावासाची) किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
———
१. १९५५ चा अधिनियम २६- कलम११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप काळेपाणी याऐवजी समाविष्ट केले.(१-१-१९५६ पासून)

Leave a Reply