Ipc कलम ४८९-क: बनावट किंवा नकली चलनी नोटा किंवा बँक नोटा कब्जात बाळगणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४८९-क:
बनावट किंवा नकली चलनी नोटा किंवा बँक नोटा कब्जात बाळगणे :
(See section 180 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बनावट किंवा नकली चलनी नोटा किंवा बँक नोटा कब्जात बाळगणे.
शिक्षा :७ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——–
जो कोणी कोणतीही बनावट किंवा नकली चलनी नोट किंवा बँक नोट ती बनावट किंवा नकली असल्याचे माहीत असूनही, किंवा तसे समजण्यास कारण असून, ती खरी म्हणून वापरावी किंवा ती खरी म्हणून वापरली जावी अशा उद्देशाने कब्जात बाळगील त्याला सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply