Ipc कलम ४८९-ई: चलनी नोटा किंवा बँक नोटा यासारखे दिसणारे दस्तऐवज बनवणे किंवा वापरणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४८९-ई:
१.(चलनी नोटा किंवा बँक नोटा यासारखे दिसणारे दस्तऐवज बनवणे किंवा वापरणे :
(See section 182 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : चलनी नोटा किंवा बँक नोटा यांसारखे दिसणारे दस्तऐवज बनवणे किंवा वापरणे.
शिक्षा :१०० रुपये द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
अपराध : मुद्रकाचे नाव व पत्ता उघड करण्याला नकार दिल्यास.
शिक्षा :१०० रुपये द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
(१) जो दस्तऐवज म्हणजे एखादी चलनी नोट किंवा बँक नोट असल्याचे दिसते किंवा कोणत्याही प्रकारे तिच्यासारखा दिसतो, किंवा चलनी नोट अगर बँक नोट म्हणून फसगत होऊ शकण्याइतपत जवळजवळ तसाच दिसतो असा कोणताही दस्तऐवज जो कोणी बनवील, किंवा बनवून घेईल, किंवा कोणत्याही प्रयोजनासाठी वापरील, किंवा कोणत्याही व्यक्तीकडे सुपूर्त करील त्याला, शंभर रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
(२) जो दस्तऐवज बनवणे हा पोटकलम (१) अन्वये अपराध आहे, त्यावर जिचे नाव दिसते अशा कोणत्याही व्यक्तीने जर पोलिस अधिकाऱ्याकडून तिला विचारणा झाली असता, कोणत्या व्यक्तीने तो छापला किंवा अन्यथा बनविला तिचे नाव पत्ता उघड करण्यास कायदेशीर सबबीशिवाय नकार दिला तर, तिला दोनशे रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
(३) ज्या कोणत्याही दस्तऐवजाबाबत पोटकलम (१) खाली कोणत्याही व्यक्तीवर अपराधाचा दोषारोप केलेला असेल त्यावर, अथवा त्या दस्तऐवजाच्या संबंधात वापरण्यात अगर देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही दस्तऐवजावर एखाद्या व्यक्तीचे नाव दिसून येईल, तेव्हा त्या व्यक्तीने तो दस्तऐवज बनवून घेतला असे, तद्विरुद्ध शाबित होईपर्यंत, गृहीत धरता येईल.)
——–
१. १९४३ चा अधिनियम ६ – कलम २ द्वारे समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply