भारतीय दंड संहिता १८६०
१.(चलनी (करेन्सी) नोटा व बँक नोटा यांविषयी :
कलम ४८९-अ:
चलनी नोटा किंवा बँक नोटा नकली तयार करणे :
(See section 178 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : चलनी नोटा किंवा बँक नोटा नकली तयार करणे.
शिक्षा :आजीवन कारावास किंवा १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——–
जो कोणी कोणतीही चलनी नोट किंवा बँक नोट नकली तयार करील, किंवा ती नकली तयार करण्याच्या प्रक्रियेपैकी कोणताही भाग पार पाडील त्याला २.(आजन्म कारावासाची) किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या आणि कलमे ४८९ब ५, ३.(४८९क सी,४८९ड डी,४८९ ई ई) यांच्या प्रयोजनार्थ बँक नोट या शब्दप्रयोगाचा अर्थ, जगाच्या कोणत्याही भागामध्ये बँक व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, अथवा कोणत्याही राजसत्तेच्या किंवा सार्वभौम सत्तेच्या प्राधिकारान्वये किंवा त्याखाली जे वचनपत्र किंवा अभिसंकेतपत्र मागणी होताच धारणकर्त्याला पैसे चुकते करण्यासाठी काढलेले असून, पैशाचा सममुल्यक म्हणून किंवा पर्याय म्हणून वापरण्यासाठी योजलेले असते असे कोणतेही वचनपत्र किंवा अभिसंकेतपत्र असा आहे.
——–
१. १८९९ चा अधिनियम १२ – कलम २ द्वारे समाविष्ट करण्यात आले.
२. १९५५ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप काळे पाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. १९५० चा अधिनियम ३५ – कलम ३ व अनुसूची २ यांद्वारे ४८९क व ४८९ ड याऐवजी समाविष्ट करण्यात आले.