Ipc कलम ४८१ : खोटे स्वामित्व (संपत्ती) चिन्ह वापरणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४८१ :
खोटे स्वामित्व (संपत्ती) चिन्ह वापरणे :
(See section 345(2) of BNS 2023)
जर कोणी कोणतीही जंगम मालमत्ता किंवा माल अगर ज्याच्या आत जंगम मालमत्ता किंवा माल आहे असा कोणताही खोका, आवेष्टन किंवा अन्य पात्र अशा रीतीने चिन्हांकित केले की, अथवा ज्यावर कोणतेही चिन्ह अंकित आहे असा कोणताही खोका, आवेष्टन किंवा अन्य पात्र अशा रीतीने वापरले की, जेणेकरुन अशी चिन्हांकित मालमत्ता किंवा माल अथवा याप्रमाणे चिन्हांकित अशा कोणत्याही पात्रात असलेली कोणतीही मालमत्ता किंवा माल ज्या व्यक्तीच्या मालकीचा नाही तिच्या मालकीचा तो आहे असा समज निर्माण व्हावा, तर त्याने खोटे स्वामित्व चिन्ह वापरले असे म्हटले जाते.

Leave a Reply