Ipc कलम ४५८ : दुखापत, हमला किंवा गैरनिरोध करण्याची पूर्वतयारी करुन नंतर रात्रीच्या वेळी चोरटे गृह अतिक्रमण किंवा घरफोडी (गृह-भेदन) :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४५८ :
दुखापत, हमला किंवा गैरनिरोध करण्याची पूर्वतयारी करुन नंतर रात्रीच्या वेळी चोरटे गृह अतिक्रमण किंवा घरफोडी (गृह-भेदन) :
(See section 331(6) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : दुखापत इत्यादी करण्याचची पूर्वतयारी करुन रात्रीच्या वेळी चोरटे गृह-अतिक्रमण किंवा घरफोडी.
शिक्षा :१४ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी
——-
कोणत्याही व्यक्तीला दुखापत करण्याची, किंवा कोणत्याही व्यक्तीवर हमला करण्याची, किंवा कोणत्याही व्यक्तीला गैरपणे निरुद्ध करण्याची, किंवा कोणत्याही व्यक्तीला दुखापतीची, अगर हमल्याची अगर गैरनिरोधाची भीती घालण्याची पूर्वतयारी करुन नंतर जो कोणी रात्रीच्या वेळी चोरटे गृहअतिक्रमण करील, किंवा रात्रीच्या वेळी घरफोडी करील त्याला चौदा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल, व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply