भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४४३ :
चोरटे गृह-अतिक्रमण:
(See section 331 of BNS 2023)
अतिक्रमणाचा विषय असलेल्या अशा इमारतीमधून, तंबूमधून किंवा जलयानामधून अतिक्रमणी व्यक्तीला अपवर्जित करण्याचा, किंवा हुसकावून लावण्याचा हक्क ज्या व्यक्तीला आहे अशा व्यक्तीपासून गृह-अतिक्रमण लपवून ठेवण्याची खबरदारी घेऊन जो कोणी असे गृह अतिक्रमण करील त्याने चोरटे गृह अतिक्रमण केले असे म्हटले जाते.