भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४४२ :
गृह-अतिक्रमण करणे :
(See section 330 of BNS 2023)
माणसाचे वसतिस्थान म्हणून वापरली जाणारी कोणतीही इमारत, तंबू किंवा जलयान, अथवा उपासनास्थान म्हणून किंवा मालमत्तेच्या अभिरक्षेचे स्थान म्हणून वापरली जाणारी कोणतीही इमारत यामध्ये प्रवेश करुन किंवा तेथे थांबून जो कोणी फौजदारीपात्र अतिक्रमण करतो तो गृह-अतिक्रमण करतो असे म्हटले जाते.
स्पष्टीकरण :
फौजदारीपात्र अतिक्रमण करणारा माणूस प्रवेश करत असताना त्याच्या शरीराचा कोणताही भाग आत शिरला की, गृह-अतिक्रमण घडण्यास तेवढे पुरेसे होते.