भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४३६ :
घर, इ. नष्ट करण्याच्या उद्देशाने किंवा स्फोटक पदार्थ याद्वारे आगळीक करणे:
(See section 326(g) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : घर, इत्यादी नष्ट करण्याच्या उद्देशाने विस्तव किंवा स्फोटक पदार्थ याद्वारे आगळीक करणे.
शिक्षा :आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
जर कोणीही विस्तव किंवा कोणताही स्फोटक पदार्थ याच्याद्वारे आगळीक केली आणि त्यामागे, सामान्यत: उपासनास्थान म्हणून किंवा माणसांचे वसतिस्थान म्हणून किंवा मालमत्तेच्या अभिरक्षेचे स्थान म्हणून वापरली जाणारी कोणतीही इमारत नष्ट करण्याचा त्याचा उद्देश असेल, अथवा त्यायोगे तसे होण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव असेल तर, त्याला १.(आजन्म कारावासाची) किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
——-
१. १९५५ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची द्वारे जन्मठेप काळे पाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.