भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४३२ :
सार्वजनिक निचरा गटारे नुकसानकारक होईल अशा प्रकारे भरुन वाहू देऊन, किंवा त्यात अडथळा निर्माण करुन आगळीक करणे:
(See section 326(c) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : सार्वजनिक निचरा-गटारे नुकसानकारक होईल अशा प्रकारे भरुन वाहू देऊन किंवा त्यात अडथळा निर्माण करुन आगळीक करणे.
शिक्षा :५ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जिच्यामुळे कोणतेही सार्वजनिक निचरा गटार त्याला क्षती किंवा नुकसान पोचेल अशा प्रकारे भरुन वाहते, किंवा त्यात अडथळा निर्माण होतो अशी, किंवा जिच्यामुळे तसे होण्याचा संभव असल्याची स्वत:ला जाणीव आहे अशी कोणतीही कृती करुन जो कोणी आगळीक करील त्याला पाच वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.