Ipc कलम ४२६ : आगळिकीबद्दल शिक्षा:

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४२६ :
आगळिकीबद्दल शिक्षा:
(See section 324(2) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : आगळीक
शिक्षा :३ महिन्यांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : ज्या व्यक्तीची हानी किंवा नुकसान झाले असेल ती व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
जो कोणी आगळीक करील त्याला, तीन महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची; किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply