Ipc कलम ४२० : ठकवणूक करणे आणि मालमत्तेची सुपूर्दगी करण्यास अप्रामाणिकपणाने प्रवृत्त करणे:

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४२० :
ठकवणूक करणे आणि मालमत्तेची सुपूर्दगी करण्यास अप्रामाणिकपणाने प्रवृत्त करणे:
(See section 318(4) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : ठकवणूक करणे आणि मालमत्तेची सुपूर्दगी करण्यास अथवा मूल्यवान रोखा बनवण्यास, त्यात फेरबदल करण्यास किंवा तो नष्ट करण्यास अप्रामाणिकपणे प्रवृत्त करणे.
शिक्षा :७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : ठकवणूक झालेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जो कोणी ठकवणूक करील आणि त्यायोगे, एखाद्या इसमाकडे एखादी मालमत्ता सुपूर्त करण्यास अथवा एखादा मूल्यवान रोखा संपूर्णपणे किंवा त्याचा कोणताही भाग अगर जी स्वाक्षरित किंवा मुद्रांकित आहे व मूल्यवान रोख्यात रुपांतरित करता येण्यासारखी आहे, अशी कोणतीही वस्तू बनवण्यास, तीत फेरबदल करण्यास किंवा ती नष्ट करण्यास या प्रमाणे फसवल्या गेलेल्या व्यक्तीला अप्रामणिकपणाने प्रवृत्त करील त्याला सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply