Ipc कलम ४१६ : तोतयेगिरी करुन ठकवणूक :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४१६ :
तोतयेगिरी करुन ठकवणूक :
(See section 319 of BNS 2023)
जर एखाद्या व्यक्तीने आपण दुसराच एखादा इसम असल्याचा बहाणा करुन, अथवा जाणीवपूर्वक एखाद्या इसमाऐवजी दुसरा इसम म्हणजे आपण स्वत: किंवा अशी अन्य व्यक्ती होय असे अभिवेदन करुन ठकवणूक केली तर, ती व्यक्ती तोतयेगिरी करुन ठकवणूक करते असे म्हटले जाते.
स्पष्टीकरण:ज्या इसमाचा बहाणा करुन तोतयेगिरी केली गेली तो इसम ही खरीखुरी व्यक्ती असली वा कल्पित व्यक्ती असली तरी अपराध घडतो.
उदाहरणे :
क) (क) हा, त्याच्याच नावाचा विवक्षित श्रीमंत सावकार म्हणजे आपणच असल्याचा बहाणा करुन ठकवणूक करतो. (क) हा तोतयेगिरी करुन ठकवणूक करतो.
ख) (क) हा, आपण म्हणजे (ख) ही व्यक्ती असल्याचा बहाणा करुन ठकवणूक करतो. ती व्यक्ती मृत आहे. (क) हा तोतयेगिरी करुन ठकवणूक करतो.

Leave a Reply