Ipc कलम ४१० : चोरीची मालमत्ता:

भारतीय दंड संहिता १८६०
चोरीची मालमत्ता स्वीकारण्याविषयी :
कलम ४१० :
चोरीची मालमत्ता:
(See section 317(1) of BNS 2023)
चोरी किंवा बलाद्ग्रहण किंवा जबरी चोरी यामुळे जिचा कब्जा हस्तांतरित झाला आहे ती मालमत्ता आणि जिचा फौजदारीपात्र अपहार झाला आहे, किंवा जिच्या बाबतीत १.(फौजदारीपात्र न्यासभंग) करण्यात आला आहे अशी मालमत्ता चोरीची मालमत्ता म्हणून संबोधण्यात येते. २.(मग ३.(भारतात) वा ३.(भारताबाहेर) कोठेही ते हस्तांतर झालेले असो, अथवा तो अपहार किंवा न्यासभंग कोठेही करण्यात येवो;) पण अशी मालमत्ता त्यानंतर जर, तिचा कब्जा घेण्यास विधित: हक्कदार असलेल्या व्यक्तीच्या कब्जात आली तर, ती चोरीची मालमत्ता असण्याचे बंद होते.
——-
१. १८९१ चा अधिनियम १२ – कलम २ व अनुसूची १ आणि १८८२ चा अधिनियम ८ – कलम ९ यांद्वारे फौजदारीपात्र न्यासभंगाचा अपराध याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. १८८२ चा अधिनियम ८ – कलम ९ द्वारे समाविष्ट करण्यात आले.
३. क्रमश: अनुकूलन आदेश १९४८, अनुकूलन आदेश १९५०, १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ व अनुसूची यांद्वारे ब्रिटिश इंडिया याऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply