Ipc कलम ४०८ : कारकुनाने किंवा चाकराने केलेला फौजदारीपात्र (आपराधिक) न्यासभंग:

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४०८ :
कारकुनाने किंवा चाकराने केलेला फौजदारीपात्र (आपराधिक) न्यासभंग:
(See section 316(4) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कारकुनाने किंवा चाकराने केलेला फौजदारीपात्र न्यासभंग.
शिक्षा :७ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : ज्या संपत्तिबाबत न्यासभंग करण्यात आला तिचा मालक.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
स्वत: कारकून किंवा चाकर असून, अथवा कारकून किंवा चाकर या नात्याने नोकरी करत असून आणि अशा न्यायाने स्वत:कडे मालमत्ता किंवा मालमत्तेवरील कसलीही हुकमत कोणत्याही रीतीने सोपविण्यात आली असताना जो कोणी त्या मालमत्तेच्या बाबतीत फौजदारीपात्र न्यासभंग करीत त्याला, सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply