Ipc कलम ४०२ : दरोडा घालण्यासाठी एकत्र जमणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४०२ :
दरोडा घालण्यासाठी एकत्र जमणे :
(See section 310(5) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : दरवडा घालण्यासाठी एकत्र जमलेल्या पाच किंवा अकि व्यक्तींपैकी एक असणे.
शिक्षा :७ वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
हा अधिनियम संमत झाल्यानंतर कोणत्याही वेळी, जो कोणी दरोडा घालण्यासाठी पाच किंवा अधिक व्यक्तींपैकी एक असेल त्याला, सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply