Ipc कलम ४०१ : चोरांच्या टोळीपैकी असल्याबद्दल शिक्षा :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४०१ :
चोरांच्या टोळीपैकी असल्याबद्दल शिक्षा :
(See section 313 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : नित्यश: चोरी करण्यासाठी संघटित झालेल्या व्यक्तींच्या भटक्या टोळींपैकी असणे.
शिक्षा :७ वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——–
हा अधिनियम संमत झाल्यानंतर कोणत्याही वेळी, जो कोणी नित्यश: चोरी किंवा जबरी चोरी करण्यासाठी संघटित झालेल्या व्यक्तींचा कोणत्याही भटक्या किंवा अन्य प्रकारच्या टोळीपैकी-ठग किंवा दरोडेखोर यांची टोळी नव्हे- असेल त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply