भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३९८ :
प्राणघातक हत्यारानिशी सज्ज असताना जबरी चोरी करण्याचा, किंवा दरोडा घालण्याचा प्रयत्न करणे :
(See section 312 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : प्राणघातक हत्यारानिशी सज्ज असताना जबरी चोरी करण्याचा किंवा दरवडा घालण्याचा प्रयत्न करणे.
शिक्षा :किमान ७ वर्षांचा सश्रम कारावास .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय
——-
जबरी चोरी करण्याचा, किंवा दरोडा घालण्याचा प्रयत्न करण्याच्या वेळी अपराधी कोणत्याही प्राणघातक हत्यारानिशी सज्ज असेल तर, अशा अपराध्याला ज्या कारावासाची शिक्षा होईल तो सात वर्षांपेक्षा कमी असणार नाही.
