Ipc कलम ३८८ : मृत्यू किंवा आजन्म कारावास इत्यादी शिक्षांस पात्र अशा अपराधाचा आरोप करण्याची धमकी देऊन बलाद्ग्रहण करणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३८८ :
मृत्यू किंवा आजन्म कारावास इत्यादी शिक्षांस पात्र अशा अपराधाचा आरोप करण्याची धमकी देऊन बलाद्ग्रहण करणे :
(See section 308(6) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : मृत्यू, आजीवन कारावास किंवा १० वर्षाचा कारावास या शिक्षेस पात्र अशा अपराधाचा आरोप करण्याची धमकी देऊन बलाद्ग्रहण करणे.
शिक्षा :१० वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
अपराध : ज्याबद्दल धमकी देण्यात आली तो अनैसर्गिक अपराध असल्यास.
शिक्षा :आजीवन कारावास .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——
एखाद्या व्यक्तीला जो कोणी तिने किंवा अन्य कोणाही व्यक्तीने मृत्यू किंवा १.(आजन्म कारावास), किंवा दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचा कारावास अशा शिक्षेस पात्र असलेला कोणताही अपराध केल्याचा किंवा करण्याचा प्रयत्न केल्याचा, किंवा असा अपराध करण्यास अन्य कोणत्याही इसमाला प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या विरूध्द किंवा त्या अन्य व्यक्तीविरूध्द करण्याची भीती घालून बलाद्ग्रहण करील त्याला, दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल आणि जर तो अपराध या संहितेच्या कलम ३७७ खाली शिक्षापात्र असलेला असा अपराध असेल, तर १.(आजन्म कारावासाची) शिक्षा होऊ शकेल.
——–
१. १९५५ चा अधिनियम २६ – कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप काळेपाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply