Ipc कलम ३८७ : बलाद्ग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मृत्यू किंवा जबर दुखापत यांची भीती घालणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३८७ :
बलाद्ग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मृत्यू किंवा जबर दुखापत यांची भीती घालणे :
(See section 308(5) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बलाद्ग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मृत्यू किंवा जबर दुखापत यांची भीती घालणे किंवा भीती घालण्याचा प्रयत्न करणे.
शिक्षा :७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——
बलाद्ग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला जो कोणी खुद्द तिचा किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू घडवून आणण्याची किंवा तिला जबर दुखापत करण्याची भीती घालील किंवा भीती घालण्याचा प्रयत्न करील त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply