भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३८६ :
एखाद्या व्यक्तीस मृत्यू किंवा जबर दुखापत यांची भीती घालून बलाद्ग्रहण करणे :
(See section 308(4) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : एखाद्या व्यक्तीस मृत्यू किंवा जबर दुखापत यांची भीती घालून बलाद्ग्रहण करणे.
शिक्षा :१० वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
एखाद्या व्यक्तीस जो कोणी खुद्द तिचा किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू घडवून आणण्याची किंवा तिला जबर दुखापत करण्याची भीती घालून बलाद्ग्रहण करील त्याला, दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.