भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३८० :
राहते घर, इत्यादीतील चोरी :
(See section 305 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : इमारत, तंबू किंवा जलयान यांतील चोरी.
शिक्षा :७ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
जी कोणतीही इमारत, तंबू किंवा जलयान मानवी वसतिस्थान म्हणून वापरण्यात येत असेल, किंवा मालमत्तेच्या अभिरक्षेसाठी वापरण्यात येत असेल त्या इमारतीमध्ये, तंबूमध्ये किंवा जलयानामध्ये जो कोणी चोरी करील त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतकया मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.