भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३७६-ब:
१.(फारकतीच्या काळात पुरुषाने आपल्या पत्नीशी लैंगिक समागम (संभोग) करणे :
(See section 67 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : फारकतीच्या काळात पतीचा पत्नीशी लैंगिक समागम.
शिक्षा : किमान २ वर्षांचा कारावास किंवा कमाल ७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र (फक्त पीडित व्यक्तीने तक्रार केल्यास )
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
जो कोणी, जी विलगीकरणाच्या हुकमनाम्यामुळे किंवा अन्य कारणाने वेगळी राहते अशा आपल्या पत्नीशी तिच्या संमतीविना लैंगिक समागम (संभोग) करील त्याला, दोन वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो, द्रव्यदंडासही पात्र असेल.
स्पष्टीकरण :
या कलमात लैंगिक समागम (संभोग) म्हणजे, कलम ३७५ खंड (अ) ते (ड) मध्ये नमूद केलेली कोणतीही कृती.)
——-
१. सन २०१३ चा फौजदारी कायदे (सुधारणा) अधिनियम क्र.१३ द्वारे सुधारीत.
