Ipc कलम ३७०-अ: अपव्यापार केलेल्या व्यक्तीची पिळवणूक करणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३७०-अ:
१.(अपव्यापार केलेल्या व्यक्तीची पिळवणूक करणे :
(See section 144 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अपव्यापार केलेल्या बालकाची पिळवणूक.
शिक्षा :किमान ५ वर्षांचा कारावास किंवा कमाल ७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
अपराध : अपव्यापार केलेल्या व्यक्तीची पिळवणूक.
शिक्षा :किमान ३ वर्षांचा कारावास किंवा कमाल ५ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
(१) जो कोणी, एखाद्या अज्ञान व्यक्तीला अपव्यापार करुन आणले आहे हे माहीत असताना किंवा तसा विश्वास ठेवण्यास कारण असताना अशा अज्ञान व्यक्तीला कोणत्याही रीतीने तिचे लैंगिक शोषण होईल अशा रीतीने कामावर ठेवील त्याला, पाच वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु जी सात वर्षांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र असेल.
(२) जो कोणी एखाद्या व्यक्तीला अपव्यापार करुन आणले आहे हे माहीत असाताना किंवा तसा विश्वास ठेवण्यास कारण असताना अशा व्यक्तीला कोणत्याही रीतीने तिचे लैंगिक शोषण होईल अशा रीतीने कामावर ठेवील त्याला, तीन वर्षांपेक्षा कमी नसेल परंतु जी पाच वर्षांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र असेल.)
——–
१.सन २०१३ चा फौजदारी कायदे (सुधारणा) अधिनियम क्र. १३ द्वारे मूळ कलमाऐवजी समाविष्ट केले.

Leave a Reply