भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३६६-ब:
१.(परकीय देशातून मुलींची आयात करणे :
(See section 141 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : परकीय देशातून मुलीची आयात करणे.
शिक्षा :१० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——–
एकवीस वर्षे वयाखालील कोणत्याही मुलीवर दुसऱ्या व्यक्तीशी विधिनिषिद्ध संभोग करण्याची बळजबरी करता यावी किंवा त्यासाठी फूस लावता यावी या उद्देशाने अथवा तिच्यावर तशी बळजबरी होईल किंवा तिला त्यासाठी फूस लावण्यात येईल असा संभव असल्याची स्वत:ला जाणीव असताना, २.(***) जो कोणी भारताच्या बाहेरील कोणत्याही देशातून ३.(किंवा जम्मू व काश्मीर या राज्यांतून) ४.(भारतात) तिची आयात करील त्याला दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.)
——–
१. १९२३ चा अधिनियम २० – कलम ३ द्वारे समाविष्ट करण्यात आले.
२. १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ व अनुसूची यांद्वारे विवक्षित शब्द गाळले.
३. १९५१ चा अधिनियम ३ व अनुसूची यांद्वारे हा मजकूर समाविष्ट करण्यात आला.
४. अनुकूलन आदेश १९४८, अनुकूलन आदेश १९५० व १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ व अनुसूची यांद्वारे ब्रिटिश इंडिया याऐवजी समाविष्ट करण्यात आले.