Ipc कलम ३६४-अ: १.(खंडणी, वगैरेकरता चोरुन नेणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३६४-अ:
१.(खंडणी, वगैरेकरता चोरुन नेणे :
(See section 140 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : खंडणी वगैरेकरिता अपहरण.
शिक्षा :मृत्यू किंवा आजीवन कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
जो कोणी कोणत्याही व्यक्तीला चोरुन नेतो म्हणजे त्याचे अपनयन करता अगर पळवून नेतो म्हणजे अपहरण करतो. किंवा असे केल्यावर त्या व्यक्तीस कैदेत डांबून ठेवतो आणि मग त्याला ठार मारण्याची किंवा दुखापत करण्याची धमकी देतो. अगर अशा प्रकारची वागणूक देतो की त्या व्यक्तीला वाजवी रीतीने भीती वाटते की त्याचा मृत्यू होईल अगर त्याला दुखापत होईल अगर त्या व्यक्तीस दुखापत करतो अगर ठार मारतो आणि असे करण्यामागे सरकारवर अगर २.(कोणत्याही परकीय सरकारवर अगर आंतरदेशीय आंतर सरकारी संस्थेवर अगर इतर कोणत्याही व्यक्तीवर) सक्ती केली जाते की त्यांनी एखादे कृत्य करावे अगर एखादे कृत्य करु नये अगर खंडणी द्यावी, असे केल्यास तो मृत्यूच्या अगर आजीव कारावासाच्या शिक्षेस पात्र होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.)
——–
१. १९९३ चा अधिनियम क्रं ४२ – कलम २ द्वारे समाविष्ट करण्यात आले.
२. १९५५ चा अधिनियम क्रं २४ – कलम २ द्वारा विवक्षित मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply