भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३६३ :
अपनयनाबद्दल शिक्षा :
(See section 137(2) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अपनयन.
शिक्षा :७ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जो कोणी कोणत्याही व्यक्तीचे १.(भारतातून) किंवा कायदेशीर पालकाच्या ताब्यातून अपनयन करील त्याला, सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
——–
१. क्रमश: अनुकूलन आदेश १९४८, अनुकूलन आदेश १९५० आणि १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ व अनुसूची याद्वारे ब्रिटिश इंडिया याऐवजी समाविष्ट करण्यात आले.