Ipc कलम ३६०: भारतातून अपनयन करणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३६०:
भारतातून अपनयन करणे :
(See section 137 of BNS 2023)
जो कोणी कोणत्याही व्यक्तीस तिच्या किंवा त्या व्यक्तीच्या वतीने संमती देण्यास विधित: प्राधिकृत असलेल्या व्यक्तीच्या संमतीवाचून १.(भारताच्या) सीमेबाहेर नेतो तो त्या व्यक्तीचे १.(भारतातून) अपनयन करतो असे म्हटले जाते.
——–
१. क्रमश: अनुकूलन आदेश १९४८, अनुकूलन आदेश १९५० आणि १९५१ चा अधिनियम ३ – कलम ३ व अनुसूची याद्वारे ब्रिटिश इंडिया याऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply