भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३४६:
गुप्तस्थळी गैर परिरोध :
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : एखाद्या व्यक्तीला गुप्तस्थळी गैरपणे परिरुद्ध करणे.
शिक्षा :कोणत्याही कलमाखालील कारावासा व्यतिरिक्त २ वर्षांचा कारावास.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : परिरुद्ध केलेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
एखाद्या व्यक्तीला परिरुद्ध केल्यास याप्रमाणे परिरुद्ध होणाऱ्या व्यक्तीमध्ये हितसंबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीस किंवा कोणत्याही लोकसेवकास ते कळू नये अथवा यात यापूर्वी निर्दिष्ट केलेल्या अशा कोणत्याही व्यक्तीस किंवा लोकसेवकास अशा परिरोधाची जागा कळू नये किंवा शोधता येऊ नये असा उद्देश सूचित होईल, अशा रितीने जो कोणी तिला गैरपणे परिरुद्ध करील त्याला, अशा गैर परिरोधाबद्दल तो ज्या अन्य कोणत्याही शिक्षेस पात्र असेल तिच्या व्यतिरिक्त आणखी दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल.