भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३४२:
गैर परिरोधाबद्दल शिक्षा :
(See section 127(2) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही व्यक्तीला गैरपणे परिरुद्ध करणे.
शिक्षा :१ वर्षाचा कारावास, किंवा १००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : निरुद्ध किंवा परिरुद्ध केलेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
——-
जो कोणी कोणत्याही व्यक्तीस गैरपणे परिरुद्ध करील त्याला, एक वर्षापर्यन्त असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा एक हजार रुपयेपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाजी किंवा दोन्ही शिक्षा होतील.