भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३४१:
गैर निरोधाबद्दल शिक्षा :
(See section 126(2) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही व्यक्तीला गैरपणे निरुद्ध करणे.
शिक्षा :१ महिन्यांचा साधा कारावास, किंवा ५०० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : निरुद्ध किंवा परिरुद्ध केलेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
जो कोणी कोणत्याही व्यक्तीस गैरपणे निरुद्ध करील त्याला, एक महिन्यापर्यंन्त असू शकेल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची, किंवा पाचशे रुपयांपर्यन्त असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.