भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३४०:
गैर परिरोध :
(See section 127 of BNS 2023)
जो कोणी एखाद्या व्यक्तीस विवक्षित वेढणाऱ्या सीमांच्या पलीकडे जाण्यास प्रतिबंध होईल अशा रीतीने तिला गैरपणे निरुद्ध करतो तो त्या व्यक्तीस गैरपणे परिरुद्ध करतो असे म्हटले जाते.
उदाहरणे :
क) (क) हा (य) ला भिंतींनी बांधलेल्या आवारात जायला लावतो आणि कुलूप लावून (य) ला आत कोंडतो. अशा प्रकारे वेढणाऱ्या भिंतींच्या मर्यादेपलिकडे कोणत्याही दिशेने जाण्यास (य) ला प्रतिबंध होतो. (क) ने (य) ला गैरपणे परिरुद्ध केले असे होते.
ख) इमारतीमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर (क) दारुगोळा हत्यारांनिशी सज्ज असलेल्या माणसांना उभे करतो आणि (य) ने इमारतीतून निघून जाण्याचा प्रयत्न केल्यास ती माणसे (य) वर गोळी झाडतील असे (य) ला सांगतो. (क) हा (य) ला गैरपणे परिरुद्ध करतो.