Ipc कलम ३२५ : इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवण्याबद्दल शिक्षा :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३२५ :
इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवण्याबद्दल शिक्षा :
(See section 117(2) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवणे.
शिक्षा :७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र १.(अजामीनपात्र)
शमनीय / अशमनीय : जिला दुखापत पोचवण्यात आली ती व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
कलम ३३५ द्वारे उपबंधित केलेली बाब खेरीजकरुन एरव्ही, जो कोणी इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवील त्याला, सात वर्षेपर्यंन्त असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
——-
१. फौजदारी प्रक्रिया संहिता अधिनियम २००५ (२००५ का २५) – कलम ४२ (एफ) (चार) द्वारा जामीनपात्र च्या ऐवजी अजामीनपात्र समाविष्ट केले परंतु अद्याप लागू नाही.

Leave a Reply