भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३२१ :
इच्छापूर्वक दुखापत पोचवणे :
(See section 115(1) of BNS 2023)
जर कोणी एखादी कृती केली असून त्यायोगे कोणत्याही व्यक्तीला दुखापत व्हावी असा त्याचा उद्देश असेल किंवा त्यायोगे कोणत्याही व्यक्तीला दुखापत पोचण्यास आपण कारण होण्याचा संभव आहे अशी त्याला जाणीव असेल आणि त्यायोगे कोणत्याही व्यक्तीला दुखापत पोचण्यास तो कारण झाला असेल, तर तो इच्छापूर्वक दुखापत पोचवतो असे म्हटले जाते.
