भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३२०:
जबर दुखापत :
(See section 116 of BNS 2023)
पुढील प्रकारच्या दुखापती याच फक्त जबर म्हणून निर्देशित करण्यात आल्या आहेत :-
पहिली : पुंस्त्वहरण. (पुरुषत्वभंग)
दुसरी : कोणत्याही डोळ्याच्या दृकशक्तीचा कायमचा विच्छेद करणे.
तिसरी : कोणत्याही कानाच्या श्रवणशक्तीचा कायमचा विच्छेद करणे.
चवथी : कोणत्याही अवयव किंवा सांधा यापासून विच्छेद करणे.
पाचवी : कोणताही अवयव किंवा सांधा यांच्या शक्तींचा नाश किंवा त्यात कायमचा बिघाड करणे.
सहावी : मस्तक (डोके) किंवा चेहरा कायमचा विद्रूप करणे.
सातवी : हाड किंवा दात मोडणे किंवा निखळवणे.
आठवी : ज्या दुखापतीमुळे जीवित धोक्यात येते अथवा पीडित व्यक्तीला वीस दिवस इतका काळ दु:सह शारीरिक वेदना सहन करावी लागते किंवा तिचे नेहमीचे व्यवसाय चालू ठेवणे अशक्य होते अशी कोणतीही दुखापत.