भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३१४ :
गर्भस्त्राव घडवून आणण्याच्या उद्देशाने केलेल्या कृतीमुळे मृत्यू घडून येणे:
(See section 90 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : गर्भस्त्राव घडवून आणण्याच्या उद्देशाने केलेल्या कृतीमुळे मृत्यू घडून येणे.
शिक्षा :१० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
अपराध : ती कृती स्त्रीच्या संमतीशिवाय केली असल्यास.
शिक्षा :आजीवन कारावास किंवा १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
जर कोणी एखाद्या गर्भवती स्त्रीचा गर्भस्त्राव घडवून आणण्याच्या उद्देशाने (विथ चाईल्ड) कोणतीही कृती केली व तिच्यामुळे अशा स्त्रीचा मृत्यू घडून आला तर त्याला, दहावर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यादंडासही पात्र होईल.
ती कृती स्त्रीच्या संमतीशिवाय केली असल्यास :
आणि जर ती कृती स्त्रीच्या संमतीशिवाय केली असेल तर, त्याला एकतर १.(आजीवन कारावासाची) किंवा वर नमूद केलेली शिक्षा होईल.
स्पष्टीकरण:
या अपराधासाठी त्या कृतीमुळे मृत्यू घडुन येणे हे संभवनीय आहे याची अपराध्याला जाणीव असली पाहिजे अशी आवश्यकता नाही.
——–
१. १९५५ चा अधिनियम – २६ कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप काळे पाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
