Ipc कलम ३०५ : बालकाच्या (अल्पवयीन मुलास) किंवा भ्रमिष्ट (वेडया) इसमास (व्यक्तीच्या) आत्महत्येला अपप्रेरणा (चिथावणी) देणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३०५ :
बालकाच्या (अल्पवयीन मुलास) किंवा भ्रमिष्ट (वेडया) इसमास (व्यक्तीच्या) आत्महत्येला अपप्रेरणा (चिथावणी) देणे :
(See section 107 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बालकाच्या अथवा भ्रमिष्ठ किंवा भ्रांतचित्त किंवा निर्बुधद व्यक्तीच्या, अथवा नशा चढलेल्या व्यक्तीच्या आत्महत्येचे अपप्रेरण.
शिक्षा :मृत्यू किंवा आजीवन कारावास किंवा १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
जर कोणतीही अठरा वर्षाहुन कमी वयाची व्यक्ती, कोणतीही भ्रमिष्ट व्यक्ती (वेडी), कोणतीही उन्मादवायू झालेली (रोगाने बेशुध्द) व्यक्ती, कोणतीही निर्बुद्धध व्यक्ती (मनोविकल मनुष्य) किंवा कोणतीही नशेच्या अवस्थेतील व्यक्ती हिने आत्महत्या केली तर, ज्या कोणी अशी आत्महत्या करण्यास अपप्रेरणा (चिथावणी)दिली असेल त्याला मृत्युदंडाची किंवा १.(आजन्म कारावासाची) किंवा जास्तीत जास्त दहा वर्षे इत्यक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
——-
१. १९५५ चा अधिनियम -२६ कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप काळे पाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply