भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३०४ :
खून या सदरात न मोडणाऱ्या (नसलेल्या) सदोष मनुष्यवधाबद्दल शिक्षा :
(See section 105 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : खून या सदरात न मोडणारा सदोष मनुष्यवध – ज्या कृतीमुळे मृत्यू घडून आला, ती कृती मृत्यू इत्यादी घडवून आणण्याच्या उद्देशाने केलेली असल्यास.
शिक्षा :आजीवन कारावास किंवा १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
अपराध : त्या कृतीमुळे मृत्यू घडून येण्याचा संभव आहे हे माहित असताना, परंतु मृत्यू, इत्याददी घडवून आणण्याचा, कोणताही उद्देश नसताना ती कृती केल्यास.
शिक्षा :१० वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय.
——-
जो कोणी खून या सदरात न मोडणारा (नसलेला) सदोष मनुष्यवध करील त्याला, ज्या कृतीमुळे मृत्यू घडून आला असेल ती कृती मृत्यू घडवून आणण्याच्या किंवा ज्यामुळे मृत्यू घडून येण्याचा संभव आहे अशी शारीरिक क्षती (दुखापत) करण्याच्या उद्देशाने केली असेल तर, १.(आजन्म कारावास) किंवा दहा वर्षे पर्यंत असु शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल;
किंवा, त्या कृतीमुळे मृत्यू घडून येण्याचा संभव आहे ही जाणीव असून, पण मृत्यू घडवून आणण्याचा किंवा जी मृत्यूला कारण होण्याचा संभव आहे अशी शारीरिक क्षती (दुखापत) घडवून आणण्याचा उद्देश नसताना ती कृती केलली असेल तर, दहा वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
——–
१. १९५५ चा अधिनियम -२६ कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप काळे पाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.