Ipc कलम ३०४-अ : १.(निष्काळजीपणामुळे (हयगयीने) मृत्यूस कारण होणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३०४-अ :
१.(निष्काळजीपणामुळे (हयगयीने) मृत्यूस कारण होणे :
(See section 106 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बेदरकारपणे किंवा हयगयीने केलेल्या कृतीमुळे मृत्यूस कारण होणे.
शिक्षा :२ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड, किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जो कोणी सदोष मनुष्यवध या सदरान न मोडणारी (नसलेला) कोणतीही बेदरकार किंवां हयगयीचे (निष्काळजीपणाचे) कृती करुन कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूस कारण होईल त्याला, दोन वर्षपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.)
——-
१. १८७० चा अधिनियम २७ – कलम १२ द्वारे समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply