भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३०३ :
आजन्म कारावास (जन्मठेप) भोगत असलेल्या कैद्याने खून केल्यास शिक्षा:
(See section 104 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : जन्मठेप – कैद्याने खून करणे.
शिक्षा :मृत्यू .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय
——–
जो कोणी प्रत्यक्षात १.(आजन्म कारावासाची) शिक्षा भोगत आहे आणि तसे असताना जर तो खून करील त्याला मृत्यूची शिक्षा होईल.
——–
१. १९५५ चा अधिनियम -२६ कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप काळे पाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.