Ipc कलम ३०२ : खुनाबद्दल शिक्षा:

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३०२ :
खुनाबद्दल शिक्षा:
(See section 103 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : खून.
शिक्षा :मृत्यू किंवा आजीवन कारावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय
——–
जो कोणी खून करील त्याला मृत्यूची किंवा १.(आजन्म कारावासाची) शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
——–
१. १९५५ चा अधिनियम -२६ कलम ११७ व अनुसूची यांद्वारे जन्मठेप काळे पाणी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply