भारतीय दंड संहिता १८६०
कलम ३०१ :
ज्या व्यक्तीचा मृत्यू घडवून आणणे उद्देशित होते त्याहून अन्य व्यक्तीचा मृत्यू घडवून आणण्याने सदोष मनुष्यवध (इच्छित माणसाच्या ऐवजी दुसऱ्याचा सदोष मनुष्यवध घडविणे) :
(See section 102 of BNS 2023)
ज्यामुळे मृत्यू घडून यावा असा स्वत:चा उद्देश आहे किंवा तसे संभवनीय असल्याची स्वत:ला जाणीव आहे अशी कोणतीही गोष्ट करुन जर एखाद्या व्यक्तीने, जिचा मृत्यू घडवून आणणे स्वत:ला उद्देशित नाही किंवा आपण त्यास कारण होण्याचा संभव असल्याची स्वत:ला जाणीव नाही अशा कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूस कारण होऊन सदोष मनुष्यवध केला तर, अपराध्याने केलेला सदोष मनुष्टवध हा, अपराध्याला जिचा मृत्यू घडवणे उद्देशित होते किंवा आपण त्यास कारण होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव होती तिचा मृत्यू त्याच्याकडून घडला असता तर ज्या वर्णनाचा झाला असता त्या वर्णनाचा तो ठरतो.(इच्छित असलेल्या व्यक्तिचा मृत्यू घडविला असे धरले जाईल त्यामागे तसा इरादा अगर जाणिव होती असे धरले जाईल.)