Ipc कलम २ : भारतात केलेल्या अपराधाकरिता शिक्षा :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम २ :
भारतात केलेल्या अपराधाकरिता शिक्षा :
(See section 1(3) of BNS 2023)
प्रत्येक व्यक्ती या संहितेच्या उपबंधांना विरोधी अशा ज्या कृतीबद्दल किंवा अकृतीबद्दल ती १.(***) २.(भारतात) दोषी असेल त्या प्रत्येक कृतीबद्दल किंवा अकृतीबद्दल या संहितेखाली शिक्षेस पात्र होईल, अन्यथा नाही.
——–
१. १८९१ चा अधिनियम १२ – कलम २ व अनुसूची १ ली यांद्वारे उक्त १ में १८६१ रोजी किंवा त्यानंतर हा मजकूर निरसित केला.
२. क्रमश: अनुकूलन आदेश १९३७, अनुकूलन आदेश १९४८, अनुकूलन आदेश १९५० आणि १९५१ चा अधिनियबम ३ – कलम ३ व अनुसूची यांद्वारे उक्त राज्यक्षेत्रे हा मजकूर वरील प्रमाणे विशोधित करण्यात आला.

Leave a Reply