भारतीय दंड संहिता १८६०
कलम २९० :
ज्यांबाबत अन्यथा उपबंध (तरतुद) केलेला नाही त्या प्रकरणी सार्वजनिक उपद्रवासाठी शिक्षा :
(See section 292 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : सार्वजनिक उपद्रव करणे.
शिक्षा :२०० रुपये द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
जो कोणी या संहितेप्रमाणे अन्यथा शिक्षापात्र नसलेल्या प्रकरणी सार्वजनिक उपद्रव करील, त्याला दोनशे रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल.