भारतीय दंड संहिता १८६०
कलम २८६ :
स्फोटक पदार्थाच्या बाबतीत हयगयीचे वर्तन :
(See section 288 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही स्फोटक पदार्थाबाबत याप्रमाणे हयगयीचे वर्तन करणे.
शिक्षा :६ महिन्यांचा कारावास, किंवा १००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
ज्यामुळे मानवी जीवित धोक्यात येईल, अगर अन्य कोणत्याही व्यक्तीस दुखापत किंवा क्षती (नुकसान) पोचण्याचा संभव असेल इतक्या बेदरकारपणे किंवा हयगयीने जो कोणी कोणत्याही स्फोटक पदार्थाबाबत कोणतीही कृती करील,
अथवा आपल्या कब्जातील कोणत्याही स्फोटक पदार्थांमुळे मानवी जीविताला पोचणाऱ्या कोणत्याही संभाव्य धोक्यापासून सुरक्षित राहण्यास पुरेसा इतका बंदोबस्त त्या पदार्थाबाबत करण्याचे जाणीवपूर्वक किंवा हयगयीने टाळील,
तर त्याला सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा एक हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.