Ipc कलम २७७ : सार्वजनिक झऱ्याचे किंवा जलाशयाचे पाणी घाण करणे:

भारतीय दंड संहिता १८६०
कलम २७७ :
सार्वजनिक झऱ्याचे किंवा जलाशयाचे पाणी घाण करणे:
(See section 279 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : सार्वजनिक झऱ्याचे किंवा जलाशयाचे पाणी घाण करणे.
शिक्षा :३ महिन्यांचा कारावास, किंवा ५०० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——–
कोणत्याही सार्वजनिक झऱ्याचे किंवा सार्वजनिक जलाशयाचे पाणी सर्वसामान्यपणे ज्यासाठी वापरण्यात येते त्या प्रयोजनार्थ (कारणांकरिता) त्याची योग्यता कमी होईल अशा प्रकारे जो कोणी इच्छापूर्वक ते दूषित करील किंवा घाण करील त्याला, तीन महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा पाचशे रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply