भारतीय दंड संहिता १८६०
कलम २६७ :
खोटे वजन किंवा माप बनविणे किंवा विकणे :
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कपटपूर्ण वापरासाठी खोटी वजने किंवा मापे बनवणे किंवा विकणे.
शिक्षा :१ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड, किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
जे कोणतेही तोलण्याचे साधन किंवा कोणतेही वजन किंवा कोणतेही लांबीरुंदीचे अगर धारकतेचे माप खोटे असल्याचे स्वत:ला माहीत आहे ते खरे म्हणून वापरले जावे यासाठी किंवा ते खरे म्हणून वापरले जाणे संभवनीय असल्याची जाणीव असून जो कोणी ते बनवील, विकेल, किंवा त्याची वासलात लावील तर त्याला, एका वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.