Ipc कलम २६५ : खोटे वजन किंवा माप यांचा कपटपूर्ण वापर करणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम २६५ :
खोटे वजन किंवा माप यांचा कपटपूर्ण वापर करणे :
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : खोटे वजन किंवा माप यांचा कपटपूर्ण वापर.
शिक्षा :१ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड, किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
——-
जो कोणी कपटीपणाने कोणतेही खोटे वजन अगर लांबीरूंदीचे किंवा धारकतेचे खोटे माप वापरील अथवा कोणतेही वजन किंवा कोणतेही लांबीरुंदीचे किंवा धारकतेचे माप ते जसे आहे त्याहून निराळे वजन किंवा माप म्हणून वापरील त्याला, एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply