Ipc कलम २६० : जो नकली आहे हे माहीत आहे असा शासकीय मुद्रांक अस्सल म्हणून वापरणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम २६० :
जो नकली आहे हे माहीत आहे असा शासकीय मुद्रांक अस्सल म्हणून वापरणे :
(See section 179 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : जो नकली असल्याचे माहीत आहे असा शासकी मुद्रांक अस्सल म्हणून वापरणे.
शिक्षा :७ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड, किंवा दोन्ही
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
कोणताही मुद्रांक महसूलाच्या प्रयोजनार्थ (कारणाकरिता) शासनाद्वारे काढलेल्या कोणत्याही मुद्राकांची नक्कल असल्याचे माहीत असून जो कोणी तो अस्सल म्हणून वापरील त्याला सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply